Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

मौजे वडगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा; 8 जण ताब्यात, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त | Raid on Gambling

शिरोली | हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे चालणाऱ्या एका अवैध जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी सोमवारी रात्री छापा (Raid on Gambling) टाकून कारवाई केली. या कारवाईत आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन मोटरसायकल, दोन चारचाकी गाड्यांसह जवळपास 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वडगाव ते नागाव दरम्यान असणाऱ्या ओढ्याच्या बाजूस एका फार्म हाऊसवर हा जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती मिळताच शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकाने  सोमवारी रात्री १० :३० वाजण्यासुमारास छापा टाकला.

यावेळी अझरुददीन कलंदर पठाण (वय 26 रा. आझाद चौक हेरले ता. हातकणंगले), सोहेल रफिक बारगीर (वय 31 रा. आझाद चौक हेरले ता. हातकगणले) , दिपक आनंदा जाधव (वय 27 रा. हेरले माळभाग ता. हातकणंगले) , अनिकेत पोपट कालगे (वय 27 रा. गंगारामनगर टोप ता. हातकणंगले) , सुर्यकांत वसंत मोटे (वय 40 रा. विठठल मंदीर बागणी ता. वाळवा जि.सांगली) , निखील गंगाराम सगट (वय 29 रा. राजेद्रनगर कोल्हापुर ता. करवीर जि. कोल्हापुर) ,आसिफ अकबर देसाई (वय 27 रा. बागणी ता. वाळवा जि.सांगली) , सुरज बाबासो पोवार (वय 28 रा. मिणचे ता. हातकगणले) अशा आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी केलेल्या कारवाईत घटनास्थळावरून तीन मोटरसायकल, दोन चारचाकी कार व रोख रक्कमेसह 5 लाख 94 हजार रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा