Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर: पूरपरिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयाना पुन्हा सुट्टी जाहीर | Kolhapur School Holiday

कोल्हापूर | पूरपरिस्थतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने करवीर तालुक्यामधील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांसह शिरोळ तालुक्यातील ०९ शाळांना दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

उपविभागिय अधिकारी, करवीर यांनी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात आज दिनांक २८ जुलै २०२४ रोजी पुरस्थिती असल्यामुळे व बऱ्याच मार्गावर पाणी असल्यामुळे व वाहतूक बंद असल्यामुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवणे उचित होईल असे कळविले आहे. तसेच तहसिलदार, शिरोळ यांनी तालुक्यातील ०९ शाळामध्ये पूरबाधीत नागरीकांसाठी निवारा केंद्र तयार करण्यात आल्यामुळे नमूद ०९ शाळा बंद ठेवण्याबाबत विनंती केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यास अनुसरून आपत्कालीन स्थितीत आवश्यकते नुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यात सद्यस्थितित पूरस्थिती निर्माण झाली असल्याने, जिल्हयातील करवीर व शिरोळ तालुक्यातील १. श्री. दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरूंदवाड २. तेरवाड आश्रमशाळा ३. एस.पी. हायस्कूल, कुरुंदवाड ४. एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड ५. चंद्रकला बालक मंदिर, कुरुंदवाड ६. सैनिकी पॅटर्न शाळा, कुरुंदवाड ७. कुमार विद्या मंदिर, जि.प. शाळा अकिवाट ८. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, तेरवाड ९. जिल्हा परिषद विद्यामंदिर, धरणगुत्ती या ०९ शाळा २९ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्यामुळे अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर, यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारान्वये जिल्हयातील करवीर तालुक्यामधील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिरोळ तालुक्यातील वर नमूद ०९ शाळांना दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे, तथापी, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेशात नमूद केले आहे.

\"\"

कोल्हापूर | हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै २०२४ अशी २ दिवस बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी याबाबत चर्चा केली होती. 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी सुरू आहे. जिल्ह्यातील राधानगरी, दुधगंगा, वारणा व तुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या धोका पातळीला वाहत आहेत, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणी येत आहे. याकरीता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

\"\"

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ व २७ जुलै २०२४, अशी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. तथापी, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

\"\"

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker