लाईट गेल्यावर बाटलीभर पाण्यामुळे घरभर उजेड; ‘ही’ भन्नाट आयडिया नक्कीच कामाची आहे, पहा व्हीडीओ.. | Simple Tips
Simple Tips For Lightning House If Electricity Is Not Available

- Story Highlights: Unexpected power cuts are common during the rainy season. A simple hack using a mobile flashlight and a water bottle can brighten your room. Just fill a plastic bottle with water and place it over your phone's flashlight. The light refracts through the water, spreading evenly in the room. This easy trick has gone viral on Instagram and is loved by many users. Ensure the bottle is not leaking and the phone can handle the weight safely.
Simple Tips: पावसाळ्याची चाहूल लागली की विजेच्या लपंडावालाही सुरुवात होते. अवकाळी पावसामुळे सध्या अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळी लाईट गेली की घरभर अंधार पसरतो आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. प्रत्येकाच्याकडे इन्व्हर्टर किंवा जनरेटर नसतो. अशा वेळी आपल्याकडे असते फक्त मेणबत्ती, कंदिल किंवा मोबाईलचा टॉर्च. पण त्यांच्यामुळे मिळणारा प्रकाश मर्यादित असतो.
मात्र, एक भन्नाट आणि अत्यंत सोपा उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. chanda_and_family_vlogs या इंस्टाग्राम पेजवर ही युक्ती शेअर करण्यात आली असून, अनेक नेटकऱ्यांना ती आवडली आहे.
नेमकं काय आहे उपाय?
chanda_and_family_vlogs
या इंस्टाग्राम पेजवर लाईट गेल्यावर घरात उजेड करण्यासाठी एक छान आणि क्रियाशील ट्रिक शेअर करण्यात आली आहे. या उपायासाठी लागतील फक्त दोन गोष्टी – तुमचा मोबाईल आणि अर्धा लिटरची पाण्याची बाटली.
काय करायचे?
- सर्वप्रथम अर्धा लिटर क्षमतेची बाटली स्वच्छ पाण्याने भरून घ्या.
- आता घरात ज्या खोलीमध्ये उजेड हवा आहे, त्या खोलीत एखादा टेबल किंवा टिपॉय ठेवा.
- त्या टेबलवर मोबाईल ठेवा आणि मोबाईलचा टॉर्च ऑन करा.
- मोबाईलच्या टॉर्चवर पाण्याने भरलेली बाटली सरळ उभी ठेवावी.
परिणाम काय?
मोबाईल टॉर्चचा प्रकाश जेव्हा बाटलीतील पाण्यावर पडतो, तेव्हा तो तितक्याच ताकदीने चहूकडे पसरतो. पाण्यामुळे प्रकाशाचा अपवर्तन (refraction) होतो आणि अंधारातही खोली उजळून निघते. घरातल्या छोट्या-मोठ्या कामांसाठी हा प्रकाश पुरेसा ठरतो.
सावधगिरी आवश्यक!
हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- बाटली व्यवस्थित बंद आहे याची खात्री करा.
- बाटली गळत नसेल याची खात्री घ्या, अन्यथा मोबाईल खराब होण्याचा धोका असतो.
- मोबाईलवर बाटलीचे वजन पेलण्याइतपत क्षमतेचा मोबाईल असावा. झेरॉक्स कागदाचा रोल किंवा मोबाईल स्टँडचा वापर केला तर अधिक सुरक्षित.
नेटीझन्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हा उपाय अनेकांनी आजमावून पाहिला असून सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक झाले आहे. अंधारात कमी खर्चात आणि अगदी सहज घरगुती उपाय करून प्रकाश मिळतो ही गोष्ट अनेकांना उपयोगी ठरली आहे.