Thane Mahapalika Bharti 2025: ठाणे महापालिकेत मेगाभरती! 12 वी ते पदवीधरांनो सरकारी नोकरीची संधी सोडू नका!

ठाणे | ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरतीला (Thane Mahapalika Bharti 2025) सुरुवात झाली असून, नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. आतापर्यंत तब्बल 12 हजार अर्ज पालिकेकडे आले असून, यापैकी पाचशेपेक्षा जास्त अर्जदारांनी परीक्षा शुल्क देखील भरले आहे. अर्जाचा हा वेग कायम राहिला तर अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच 2 स्पटेंबर पर्यंत अर्जांची संख्या दीड ते तीन लाखांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी ठरू शकते. ठाणे महापालिकेच्या आस्थापनातील लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय अशा विविध विभागांमध्ये एकूण 1,773 रिक्त पदे भरली जाणार आहेत. गट ‘क’ व गट ‘ड’ मधील ही पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्यात येणार असून, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर विशेष टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Thane Mahangarpalika Jobs 2025 Advt.
Thane Mahapalika Bharti 2025
भरतीसाठी 12 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि त्यानुसार परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
शुल्क संरचना अशी ठेवण्यात आली आहे. अमागास प्रवर्गासाठी 1,000 रुपये, मागास व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये, तर माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना शुल्कात पूर्ण सूट देण्यात आली आहे. परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर दिली जाणार आहे.
भरतीमध्ये सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, वाचा उपचार तज्ञ, डायटिशियन, फिजिओथेरपिस्ट, वॉर्डबॉय, दवाखाना आया अशा विविध पदांचा समावेश आहे. त्यामुळे नोकरीच्या संधींच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ठाणे महापालिकेची भरती ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
| Full PDF जाहिरात | https://shorturl.at/qt9Vx |
| ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ps28U |
| अधिकृत वेबसाईट | https://thanecity.gov.in/ |

Important Date For Thane Mahanagarpalika Bharti 2025
| अ. क्र. | तपशील | विवित कालावधी |
| १. | अर्ज सादर करावयाचा कालावधी | दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी १४:०० ते दिनांक ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी २३:५९ |
| २. | ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक | दिनांक ०२ सप्टेंबर, २०२५ रोजी २३:५९ |
| ३. | परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक | परीक्षेच्या ७ दिवस अगोदर |
| ४. | ऑनलाईन परीक्षेची दिनांक | ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होईल |
| ५. | तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन | ०२२-६१०८७५२० |
| ६. | जाहिरातीमधील बाबीसंबंधी विचारणा करण्यासाठी | ०२२-२५४१५४९९ वेळ : कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार १०:३० ते १७:३०, tmcrecruitment2025@gmail.com gmail.com |
परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्या जातील. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


