नोकरी

UPSC अंतर्गत 494 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | UPSC Bharti 2025

संघ लोक सेवा आयोगामार्फत (UPSC) विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कायदेशीर अधिकारी, ऑपरेशन्स ऑफिसर, वैज्ञानिक अधिकारी, शास्त्रज्ञ-ब, सहयोगी प्राध्यापक, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, संशोधन अधिकारी, अनुवादक, औषध निरीक्षक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहाय्यक अभियंता अशा एकूण 494 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांतील उच्च पदांवर निवड होणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून 12 जून 2025 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज सादर करावा.

महत्त्वाची माहिती:

  • एकूण पदसंख्या: 494
  • वयोमर्यादा: 30 ते 45 वर्षे (पदांनुसार बदलू शकते)
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असावी. काही पदांसाठी पदवीधर, तर काहींसाठी पदव्युत्तर, इंजिनीअरिंग, मेडिकल, कायदापदवी व अनुभव आवश्यक आहे.
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज फी: ₹25/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2025
  • अधिकृत वेबसाइट: https://upsconline.nic.in/

पदांनुसार जागा:

पदाचे नावजागा
Operations Officer121
Public Health Specialist Grade III18
Training Officer (Principles of Teaching/Training Methodology)22
Specialist Grade III (Radio-Diagnosis)21
Drugs Inspector (Medical Devices)20
Training Officer (Computer Software Application)19
Specialist Grade III (General Medicine)26
Assistant Director (Official Language)17
Specialist Grade III (Various Specialities)100+
Legal Officer, Scientist B, Translator, Research Officer, Associate Professors इ.उर्वरित पदे

शैक्षणिक पात्रता (मुख्य अंश):

पदाचे नावपात्रता
Legal Officerमास्टर्स डिग्री इन लॉ
Operations Officerपदवी/पदव्युत्तर /BE/B.Tech
Scientist-BBE/B.Tech
Specialist Grade IIIMBBS व संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
Training Officerडिप्लोमा/पदवी

ही भरती प्रक्रिया UPSC द्वारे घेतली जात असून, पदांच्या स्वरूपानुसार उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत किंवा अनुभवाच्या आधारे होऊ शकते. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

PDF जाहिरातhttps://tinyurl.com/5y6rjfmu
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/lUHoC
अधिकृत वेबसाईटhttps://upsconline.nic.in/

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker