लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनो लक्ष द्या; हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर… | Ladki Bahin Yojana May
May installment of Ladki Bahin Yojana likely to be credited between June 12 and 15.

मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana May) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत असून प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची त्या आतुरतेने वाट पाहत असतात.
राज्य सरकारने नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले होते. यावेळी काही महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले होते, तर काही महिलांच्या खात्यात एकाचवेळी 3000 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक लाभार्थींना आर्थिक दिलासा मिळाला होता.
मात्र, जून महिना सुरू झाल्यानंतरही मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. जून महिन्याचे दहा दिवस उलटल्यानंतरही पैसे न मिळाल्यामुळे लाभार्थी महिलांकडून सातत्याने मे महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला जात होता. सामाजिक माध्यमांवर तसेच विविध स्तरांवर याबाबत चर्चा सुरू होती.
दरम्यान, आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भाजपच्या नेत्या तथा आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे.
मोनिका राजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता 12 जून ते 15 जून या कालावधीत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
याचा अर्थ असा की, पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 12 ते 15 जून दरम्यान 1500 रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची नियमित पडताळणी करावी, असेही सांगितले जात आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून लाखो लाभार्थी महिलांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

