Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

Congress Politics : सतेज पाटील यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड, विश्वजीत कदम, अमित देशमुख यांनाही मोठी जबाबदारी!

मुंबई | काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसने विधिमंडळ पक्षासाठी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज उर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मुख्य प्रतोद म्हणून अभिजित वंजारी यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. याबरोबरच विधानसभेच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख तर सचिवपदी विश्वजीत कदम यांची वर्णी लागली आहे. तसेच शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांची नावे चर्चेत होती. मात्र, काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र आता प्रदेशाध्यक्ष पदांच्या शर्यतीत असणाऱ्या अनेक नावांनाच विधीमंडळ पक्ष पदाधिकारी म्हणून संधी दिली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा