मोठी बातमी: Walmik Karad हाच मास्टरमाइंड! संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा मोठा खुलासा! Santosh Deshmukh
Santosh Deshmukh: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण होत आले असूनही त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. यावर आता सीआयडीने मोठा खुलासा करत वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख सुत्रधार असल्याचे स्पष्ट केले आहे.बीडच्या विशेष कोर्टात सीआयडीने 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात वाल्मिक कराडला क्रमांक 1 चा आरोपी ठरवले आहे. आरोपपत्रानुसार, कराड यानेच हत्येचा कट रचला आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा अंमलात आणला आहे.
हत्या कटात कोण कोण सहभागी?
वाल्मिक कराडसह आरोपी विष्णू चाटे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, जयराम चाटे यांनी संतोष देशमुखांची हत्या केली, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, याच प्रकरणातील दोन आरोपी रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपी तर सोनवणे हा देशमुख हत्या प्रकरणात सामील असल्याचा आरोप होता. त्यामुळे या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल का झाले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
आरोपींना माफीचा साक्षीदार बनवले जाणार?
सीआयडीच्या तपासानंतर या दोघांची नावे पुरवणी आरोपपत्रात येतात की त्यांना माफीचा साक्षीदार बनवले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याने वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.