बातम्या

पुणे बलात्कार प्रकरणात Rupali Thombare यांचा खळबळजनक दावा, म्हणाल्या; “पैसे दिले नाहीत म्हणून.. पुणे नाहकच बदनाम…” | Pune Rape Case

पुणे | स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार (Pune Rape Case) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरट्याने पीडितेला भावनिक साद घालत बसमध्ये नेले आणि बलात्कार केला. तसेच, कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळानंतर पीडितेने मित्राला हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अतिशय असंवेदनशीलपणे केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा प्रकार संमतीच्या संबंधानंतर व्यवहारातील पैशांवरून झाल्याचा दावा केला. याआधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील फोर्सफुल प्रकार नसल्याचे म्हटले होते.

आरोपीच्या वकिलांनीही न्यायालयात दावा केला की, पीडित आणि आरोपी यांच्यात सहमतीने संबंध झाले होते आणि कोणताही अत्याचार झालेला नाही. मात्र, न्यायालयाने आरोपीला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट काय?

पुणे शिवाजीनगर कोर्टात बस स्टँडमधील आरोपीला आणायच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली. मॅडम तुम्ही आंदोलन करणार असाल, आरोपीला काळे फसणार करणार असाल तर प्लीज करू नका. त्याच वेळी साहेबांना सांगितले घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतेच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे. केसची माहिती घेणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे, असे रुपाली पाटील यांनी लिहिले आहे.
बस स्टँड घटनेत पुणे नाहकच बदनाम झाले. एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून.. याचा प्रचंड खेद वाटतो. दुसरे, बस स्टँड आगराची… व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार बाहेर आला. आता त्यांना सुट्टी नाही. नोकरीवर काम चोख करा नाहीतर घरी बसा कायमचे. तूर्तास एवढेच….

दरम्यान, रुपाली ठोंबरे यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे अत्याचार प्रकरणी त्यांनी केलेल्या दाव्यामुळे विरोधक रुपाली ठोंबरे आणि अजित पवार गटावर निशाणा साधू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker