Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello KolhapurNews

संतोष वडेर यांची हातकणंगले लोकसभा वैद्यकीय कक्ष संपर्क प्रमुखपदी निवड | Medical Relief Aid Cell

कोल्हापूर | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात गरजू आणि गरीब रुग्णांसाठी वैद्यकीय कक्षाच्यावतीने (Deputy Chief Minister’s Medical Relief Aid Cell) आर्थिक मदत सुरू आहे. या उपक्रमाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील गरजूंपर्यंतही पोहोचण्यासाठी नुकत्याच निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये हातकणंगले लोकसभा क्षेत्रातील संपर्क प्रमुख म्हणून संतोष वडेर यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.

ही नियुक्ती उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे (Deputy Chief Minister’s Medical Relief Aid Cell) प्रमुख मंगेश चिवटे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली.

संतोष वडेर यांनी यापूर्वी अनेक वर्षे पत्रकारिता, राजकीय जनसंपर्क आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचे होस्ट आणि निवेदक म्हणूनही त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताना वडेर यांनी सांगितले की, “मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, खासदार धैर्यशील माने, मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर तसेच जिल्ह्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही जबाबदारी पार पाडणार असून, हातकणंगले लोकसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत पोहचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा