रेल्वे अंतर्गत 30 हजार पदांची मेगाभरती; तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, लिपीक, टंकलेखक अशी विविध पदे रिक्त | RRB NTPC Bharti 2025

NTPC Bharti 2025: रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC) ने विविध पदांसाठी तब्बल 30,307 रिक्त जागांची घोषणा केली आहे. या भरतीत मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक तसेच वरिष्ठ लिपिक व टंकलेखक या पदांचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 29 सप्टेंबर 2025 पर्यंत भरून पूर्ण करणे आवश्यक आहे.
पदसंख्या व तपशील:
पदाचे नाव | पदसंख्या | मासिक वेतन |
---|---|---|
मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक | 6,235 | ₹35,400 |
स्टेशन मास्टर | 5,623 | ₹29,200 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 3,562 | ₹29,200 |
कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक | 7,520 | ₹29,200 |
वरिष्ठ लिपिक व टंकलेखक | 7,367 | ₹29,200 |
NTPC Bharti 2025
या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असून ती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
निवड झालेल्या उमेदवारांना ₹29,200 ते ₹35,400 इतके मासिक वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://indianrailways.gov.in/ येथे भेट द्यावी.
PDF जाहिरात | https://shorturl.at/L4BgR |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/Z9sDM |
अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |