हॅलो कोल्हापूरबातम्या
जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ; आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्ती अहवाल प्रसिद्ध | Kolhapur Rain

दि.19/08/2025 – दुपारी 03:00 वा.
राजाराम बंधारा पाणी पातळी
36.05″ (541.29m)
विसर्ग 40458 cusecs
(नदी इशारा पातळी 39’00” व धोका पातळी 43’00”)
पाण्याखालील बंधारे-80
जिल्ह्यात एकूण सरासरी 65.5 मिमी पाऊस, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 151.3 मिमी पावसाची नोंद
कोल्हापूर | राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सूरू असून कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस (Kolhapur Rain) पडत आहे. जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. नैसर्गिक आपत्ती विषयी जिल्हा प्रशासनाकडून दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 19 ऑगस्ट 2025 रोजीच्या सकाळी 10 वाजेपर्यंतचा अहवाल पुढील प्रमाणे आहे.
Kolhapur Rain: तालुकानिहाय पर्जन्यमान (गेल्या २४ तासांत)
तालुका | पाऊस (मिमी) |
---|---|
हातकणंगले | 50.8 |
शिरोळ | 34.4 |
पन्हाळा | 70.9 |
शाहुवाडी | 77 |
राधानगरी | 91.8 |
गगनबावडा | 151.3 |
करवीर | 59.9 |
कागल | 72 |
गडहिंग्लज | 51.9 |
भुदरगड | 92.2 |
आजरा | 66.9 |
चंदगड | 65.4 |
वाहतूक स्थिती
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग खुले असले तरी अनेक राज्य व जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.
- राज्यमार्ग: ४ बंद
- प्रमुख जिल्हा मार्ग: १२ बंद
- इतर जिल्हा मार्ग: १ बंद
- ग्रामीण मार्ग: १० बंद
एकूण २७ मार्गांवर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरु आहे.
नुकसानीचा आढावा
- घरे पूर्णपणे पडली: ४
- घरे अंशतः पडली: ४ (पक्की), ६२७ (कच्ची)
- गोठे बाधित: ३९
- जिवीतहानी: आतापर्यंत ३ मृत्यू
- मृत जनावरे: ७ मोठी दुधाळ जनावरे
- खासगी मालमत्ता नुकसान: ६६१ प्रकरणे
- सार्वजनिक मालमत्ता नुकसान: ५ प्रकरणे
नदी पातळी (१९ ऑगस्ट सकाळी १० वा.)
- राजाराम बंधारा – ३५.११ फूट (इशारा: ३९, धोका: ४३)
- शिरोळ – ४३.०० फूट (इशारा: ७४, धोका: ७८)
- नृसिंहवाडी – ४०.६ फूट (इशारा: ६५, धोका: ६८)
- सुर्वे – ३२.८ फूट (इशारा: ४८, धोका: ५०)
- रुई – ६१.०८ फूट (इशारा: ६७, धोका: ७०)
- इचलकरंजी – ५७.०२ फूट (इशारा: ६८, धोका: ७१)
- तेरवाड – ५१ फूट (इशारा: ७१, धोका: ७३)
धरणस्थिती
- राधानगरी धरण: १००% भरलेले, ११,५०० क्यूसेक विसर्ग (सर्व ७ दरवाजे खुले)
- तुळशी धरण: ९९% भरलेले, १५०० क्यूसेक विसर्ग
- वारणा धरण: ९३% भरलेले, १८,६३० क्यूसेक विसर्ग
- दूधगंगा धरण: ९३% भरलेले, ७६०० क्यूसेक विसर्ग