भारतीय नौदलात 1315 पदांची भरती; नविन जाहिरात प्रकाशित | Indian Navy Bharti 2025

Indian Navy Bharti 2025: भारतीय नौदल अकादमी अंतर्गत “कारागीर कुशल प्रशिक्षणार्थी” या पदासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1315 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे किमान दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना ₹19,900 ते ₹63,200 इतके वेतन मिळणार आहे.
Indian Navy Bharti 2025
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती योग्य स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. अपूर्ण अर्ज थेट नाकारले जातील. अर्ज प्रक्रियेबाबत अधिक सविस्तर माहिती व आवश्यक सूचना भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.indiannavy.nic.in/) उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
PDF जाहिरात | https://shorturl.at/lF9XJ |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/7jIGp |
अधिकृत वेबसाईट | https://www.indiannavy.nic.in/ |