बातम्या

Pune Rape Case | एक लाखाचे बक्षीस कोणाला मिळणार? पुणे पोलीस आयुक्तांनी केली मोठी घोषणा

पुणे | स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

एक लाख रुपयांचे बक्षीस कुणाला मिळणार? Pune Rape Case

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे दत्ता गाडे अटक झाल्यानंतर हे बक्षीस कोणाला मिळणार, याची उत्सुकता होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

“ज्या व्यक्तीने शेवटची महत्त्वाची माहिती दिली, त्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच, गुनाट गावातील ग्रामस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे,” असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

तपासादरम्यान ४०० ते ५०० ग्रामस्थांचा महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. तसेच श्वान पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. ड्रोनच्या मदतीने आरोपीचे लोकेशन शोधण्यात आले आणि पोलिसांनी रात्री १.१० वाजता दत्ता गाडेला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीच्या अटकेनंतर पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये श्रेयवादाची चर्चा रंगली होती. मात्र, हा संयुक्त प्रयत्न असल्याचे स्पष्ट करत, “यामध्ये कोणताही श्रेयवाद नाही. पोलिस आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही कारवाई यशस्वी झाली,” असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा