नोकरी
मुंबईत बालविकास प्रकल्प अंतर्गत ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांसाठी मोठी भरती; त्वरित ऑफलाईन पध्दतीने अर्ज करा | Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2025
Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2025: बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना (नागरी) प्रकल्प, अंधेरी पश्चिम, मुंबई अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 30 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस म्हणजेच 15 फेब्रुवारी 2025 आहे.
भरतीचा तपशील: Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2025
- पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
- एकूण जागा: 30
- शैक्षणिक पात्रता: किमान 12 वी उत्तीर्ण किंवा अधिक (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी).
- वयोमर्यादा:
- सर्वसाधारण उमेदवार: 18 ते 35 वर्षे
- विधवा उमेदवार: 40 वर्षे
- वेतनश्रेणी: रुपये 7,500/-
- नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची प्रक्रिया: Anganwadi Bharti Application 2025
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
- अर्ज कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया वगळून) स्वीकारले जातील.
- मुदतीनंतर व पोस्टद्वारे उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अर्ज अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास तो नाकारला जाईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, (नागरी) प्रकल्प, अंधेरी पश्चिम, दुसरा माळा, रूम नं 209, बी-विंग, पॅराडाईस अंधेरी SRA को. ऑप. हौसिंग सोसायटी, चांदीवाला कंपाउंड, एस. व्ही. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई – 58.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2025
अधिक माहितीसाठी आणि मूळ जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट mumbaicity.gov.in भेट द्यावी.
| PDF जाहिरात | Anganwadi Bharti 2025 |
| अधिकृत वेबसाईट | mumbaicity.gov.in |


