नोकरी
महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि. येथे 22 रिक्त पदांची भरती | MAHAPREIT Bharti 2025
MAHAPREIT Bharti 2025: महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (MAHAPREIT) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.
रिक्त पदांचा तपशील – MAHAPREIT Bharti 2025
- मुख्य महाव्यवस्थापक (नियामक आणि व्यावसायिक विभाग) – 01
- महाव्यवस्थापक – 02
- कार्यकारी अभियंता – 01
- वैयक्तिक सहाय्यक आणि समन्वयक – 01
- उपअभियंता – 06
- वरिष्ठ विश्लेषक (गुंतवणूक बँकिंग) – 01
- सहाय्यक अभियंता – 10
- एकूण पदसंख्या – 22
शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी MAHAPREIT च्या अधिकृत वेबसाईटवर (https://mahapreit.in/) उपलब्ध आहेत. भरतीसाठी मुंबई हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज प्रशासकीय विभाग, MAHAPREIT, B-501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 या पत्त्यावर पाठवावा.
- अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 24 फेब्रुवारी 2025
| PDF जाहिरात | MAHAPREIT Bharti 2025 |
| अधिकृत वेबसाईट | https://mahapreit.in/ |


