नोकरी

पाहिजेत: कोल्हापूरात ‘या’ विविध ठिकाणी नोकरी; 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर, उच्चशिक्षित अशा सर्वांसाठी संधी | Kolhapur Jobs 2025

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात (Kolhapur Jobs 2025) असणाऱ्या उमेदवारांसाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे देत आहोत. जर तुमच्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणांना, कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना देखील नोकरीची आवश्यकता असेल आणि खाली देण्यात आलेल्या नोकऱ्यांपैकी त्यांच्यासाठी एखादी नोकरी योग्य असेल तर ही बातमी त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा.

1. साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. याठिकाणी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 15 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आज (रविवार) मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीचे ठिकाण – अनंत टॉवर, साईक्स एक्सटेंशन, रेल्वे फाटकजवळ, राजारामपुरी, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी 8349505120 किंवा 8349505121 या क्रमांकावर संपर्क साधावा.

2. डेक्कन इन्फ्रावेंचर्स प्रा. लि. यांना अकाऊंट मॅनेजर, ज्युनिअर इंजिनिअर, साईट सुपरवायझर, एचआर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. यासाठी बीकॉम, एमकॉम, डिप्लोमा, बीई सिव्हील, पदवीधर, एमबीए -एचआर अशी पात्रता धारण केलेले उमेदवार त्या-त्या पदानुसार पात्र आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 9326563803 किंवा hr@deccaninfra.com यावर संपर्क साधावा.

3. साईज् फायनान्शिअल सर्विसेस यांना फिल़्ड एक्झिक्युटिव्ह, सुपरवायझर, टेलीकॉलर अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. यासाठी फ्रेशर्स उमेदवार देखील पात्र असून इच्छूकांनी साईज फायनान्शिअल सर्विसेस, रॉयल फाटकजवळ, कोल्हापूर येथे किंवा 7498355844, 8010714350 या क्रमांकावर संपर्क साधावा.

4. महालक्ष्मी रिशेलर्स प्रा. लि. यांना असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर, क्वालिटी इन्सपेक्टर, सुपरवायझर अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी ई-6 एमआयडीसी, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर किंवा mrlroller@hotmail.com, 9922434509 या क्रमांकावर संपर्क साधावा.

5. ब्लूबॉक्स इवेंट टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांना अकाऊंटंट कम क्लार्क पदासाठी उमेदवाराची आवश्यकता आहे. उमेदवारास जीएसटी, टीडीएस यासह अकाऊंटिंग व ऑनलाईन बँकीगचे ज्ञान आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी WB, 102, पहिला मजला, सिल्हरग्लेड्स अपार्टमेंट, हॉटेल लिशा जवळ, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. अथवा 8806060819 या क्रमांकावर कॉल करावा. तसेच operations@blueboxnetwork.pro या इमेल आयडीवर रिझुम्ये पाठवावा.

6. कोल्हापूरातील टूव्हीलर डिलरशिप माई टीव्हीएस यांना मॅनेजर, सुपरवायझर, सर्विस अॅडव्हायझर, टेक्निशिअन, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह जीपीटी कॉम्प्लेक्स, ओपल हॉटेलसमोर, जुना पुणे बेंगलोर रोड, कोल्हापूर येथे समक्ष भेटावे. किंवा 9623245800 या क्रमांकावर संपर्क साधावा.

7. चंद्रकांत रोपवाटिका, कसबा सांगाव, ता. कागल यांना कॉम्प्युटर ऑपरेटर, अकाऊंटट अशा पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. यामध्ये ऑपरेटर पदासाठी एमएससीआयटी पात्र महिला उमेदवार किंवा अकाऊंटट पदासाठी बीकॉम पात्रताधारक उमेदवार गरेजेचे आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 9960152520 किंवा 9420010344 या क्रमांकावर संपर्क साधावा.

8. दोशी आर्थोपेडिक & एन्डोक्राईन सेंटर यांना मेडिकल ऑफिसर, ओटी असिस्टंट, नर्स, रिसेप्शनिस्ट अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी सीबीएस स्टँड जवळ, न्यू शाहूपूरी किंवा 9518557386 या क्रमांकावर संपर्क साधावा.

9. क्रेयान्स इंटरनॅशनल स्कूल यांना प्रिंसिपल, स्कूल कोऑर्डीनेटर, अॅडमिशन कौंसेलर, रिशेप्सनिस्ट, पी.आर., प्रायमरी & सेकंडरी टिचर, प्री-प्रायमरी टिचर, अकाऊंट एक्झिक्युटिव्ह, कँटीन सर्विस प्रोव्हायडर, स्कूल बस ड्रायव्हर (बससहित), क्लर्क, शिपाई, माळी, मावशी, सफाई कामगार अशा विविध पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी आपला सीव्ही आणि पासपोर्ट साईज फोटोसह प्रेसिडेंट, कोल्हापूर आर्य समाज एज्युकेशनल इंस्टिट्यूशन, जयप्रभा स्टुडिओच्या पाठीमागे, भक्ती पूजानगर, सुभाष रोड, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे भेटावे.

Sangli Jobs 2025

10. वॅलिएंट एअरकॉम यांना एसी टेक्निशिअन – 10, एचव्हीएसी डिझाईन इंजिनिअर -1, अशा पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. यासाठी योग्य ती पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी एस-6, वरदस्पर्श अपार्टमेंट, ओल्ड पूर्वा गार्डन समोर, वानलेसवाडी, विद्यानगर सांगली येथे संपर्क साधावा.

सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी दररोजच्या नोकरीसंदर्भातील अपडेटसाठी हॅलो कोल्हापूर (hellokolhapur.com) या पोर्टलवरील नोकरी सेक्शनला भेट द्या. याठिकाणी तुम्हाला राज्यासह केंद्रसरकारच्या अखत्यारितील विविध ठिकाणच्या नोकरींची माहिती मिळेल.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker