Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

अखेर कोल्हापूर उत्तरचं ‘उत्तर’ मिळालं; महाविकास आघाडीकडून काँग्रेसने दिली कार्यकर्त्याला संधी

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सस्पेन्स अखेर संपला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीने काँग्रेस राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर उत्तर मधून महाविकास आघाडीचा चेहरा कोण याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

सुरूवातीला कोल्हापूर उत्तर मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान आमदारांना संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र विद्यमान आमदारांना लोकसभेपासूनच काँग्रेसच्या नेतृत्वाने बेदखल केल्याचं चित्र होतं. त्यामुळे जयश्री जाधव यांच्या उमेदवारीचा मार्ग तेव्हाच संपुष्टात आला होता.

गेले कित्येक दिवस उत्सुकता लागलेल्या कोल्हापूर उत्तर मतदार संघामधून राजेश भरत लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. काँग्रेसने काही वेळापूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर केलीय. आमदार सतेज पाटील यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असं जाहीर केलं होतं.

त्याप्रमाणे राजेश लाटकर यांची उमेदवारी त्यांनी जाहीर करून आपला शब्द पाळला आहे. माजी नगरसेवक असलेले राजेश लाटकर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं सभापतींपद भूषवलंय. त्यांची पत्नी मंजिरी लाटकर या माजी महापौर आहेत. तळागाळातून वर आलेलं एक सर्वसामान्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा