Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

अखेर वाल्मिकच्या धन्याचा राजीनामा! Dhananjay Munde

Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या हत्येचे संतापजनक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) राजीनामा देण्याचे थेट आदेश दिल्यानंतर मुंडेनी राजीनामा द्यावा लागला आहे.

मुंडेनी आपल्या पीए मार्फत हा राजीनामा सागर बंगल्यावर पाठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा राजीनामा स्विकारून माध्यमांशी संवाद साधत मुंडेनी राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली. हा राजीनामा आता पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपुर्द करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

हत्येचे संतापजनक फोटो आणि आरोपींचा अमानुषपणा

संतोष देशमुख यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला होता. आरोपींनी त्यांच्यासोबत सेल्फी मोडमध्ये फोटो काढले, त्यांच्या शरीरावर लघुशंका केली आणि त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची तयारी – Dhananjay Munde Resign

या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आल्याचे समजते. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांसारखे बडे नेते उपस्थित होते. बैठकीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाली होती.

नवीन गुन्हा दाखल होणार

या हत्येप्रकरणात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल होणार आहे. संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा केज पोलिस ठाण्यात नोंदवला जाणार आहे. याआधी हत्येच्या आरोपाखाली खंडणी आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे आधीच दाखल आहेत.

राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री होते आग्रही

काल या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस हे धनंजय मुंडेंशी बोलले. रात्री त्यांनी मुंडेंशी चर्चा करत, उद्या राजीनामा द्या असे त्यांना सांगितलं. तर अजित पवार यांनीही मुंडेंची कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस हे सुरूवातीपासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. पण धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे अजितदादांनी निर्णय घ्यावा असं फडणवीसांनी सांगितलं होतं. तरीही मुंडेनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळं अखेर फडणवीसांनी त्यांना आज राजीनामा देण्याचा थेट आदेश दिला.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा