संजीवन इंग्लिश मिडियम स्कूलचा CBSE परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश | CBSE Result 2025

कोल्हापूर | श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवन इंग्लिश मिडियम स्कूल, रंकाळा या नामांकित शाळेने सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Result 2025) फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ठ यशामुळे संपूर्ण शाळा आणि संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे शाळेचे एकूण २० विद्यार्थी ‘विशेष प्रथम श्रेणीत’ उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे आहे:
🔹 प्रथम क्रमांक: कु. दर्शिल पोवार – 93.20%
🔹 द्वितीय क्रमांक: कु. श्रावणी दवंग – 92.40%
🔹 तृतीय क्रमांक: कु. समरजीत सासने – 92.20%
🔹 चतुर्थ क्रमांक: कु. श्रावणी पाटील – 91.60%
🔹 पाचवा क्रमांक: कु. साहिल पुरोहित – 90.60%
या उत्तुंग यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि संजीवन इंग्लिश स्कूलच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. मेघराज खराडे, सेक्रेटरी अजित खराडे, चेअरपर्सन अमर सरनाईक, संचालक युवराज पाटील, प्राचार्या अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्या स्नेहा पाटील, फायनान्स डायरेक्टर ऐश्वर्या पाटील-भवड, विभाग प्रमुख सुप्रिया किरवेकर, स्नेहा कदम, संध्या चिले, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला.


