बातम्या

हातकणंगलेत उमेदवारचं उमेदवार! प्रकाश आवाडेही लोकसभेच्या रिंगणात | Hatkanangale Loksabha Election 2024

कोल्हापूर | हातकणंगले लोकसभा मतदार संघात (Hatkanangale Loksabha Election 2024 ) नवा राजकीय धमाका पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या सहयोगी ताराराणी पक्षाचे राहूल आवाडे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे चर्चेत होते. मात्र आज थेट आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे आवाडे यांनी जाहीर केले. यामुळे या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पंचरंगी होणार आहे. आमदार आवाडे यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ताराराणी पक्षाच्या वतीने खुद्द आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने हातकणंगले लोकसभा मतदार संघात पंचरंगी निवडणुक होणार आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले असून निवडणुकीत उभारणार आणि जिंकणार देखील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हातकणंगलेत उमेदवारचं उमेदवार!

याआधी महायुतीकडून शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे रिंगणात आहेत. तर त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आव्हान दिले आहे. तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही चौरंगी लढत लोकसभा मतदारसंघात चर्चेत असताना आज त्यात आणखी एका तगड्या उमेदवाराच्या नावाची भर पडली आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker