अर्ज करण्याची शेवटची संधी: IBPS Clerk Bharti 2025, पदवीधरांसाठी 10,277 लिपिक पदांची भरती

IBPS Clerk Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने 10,277 लिपिक (Clerk) पदांची भरती जाहीर केली असून, यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या भरतीसाठी 21 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असून, इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे.
भरतीची ठळक माहिती: IBPS Clerk Bharti 2025
- पदाचे नाव – लिपिक (Clerk)
- पदसंख्या – 10,277
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. (पदासाठी आवश्यक अटी मूळ जाहिरातीत तपासा)
- वयोमर्यादा – किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे. (आरक्षित प्रवर्गासाठी वयमर्यादेत सवलत लागू)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात विविध बँकांमध्ये
- वेतनश्रेणी – ₹24,050 पासून ₹64,480 पर्यंत
परीक्षेचे वेळापत्रक:
- अधिकृत जाहिरात प्रसिद्ध – 29 जुलै 2025
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
- पूर्व परीक्षा (Prelims) – 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025
- मुख्य परीक्षा (Mains) – 29 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर www.ibps.in भेट देऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे बंधनकारक आहे.
अर्ज फी:
- सामान्य प्रवर्ग – ₹850/-
- SC/ST/PWD प्रवर्ग – सवलतीनुसार
महत्त्वाचे मुद्दे:
IBPS मार्फत दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर लिपिक पदांसाठी भरती घेतली जाते. यंदाच्या भरतीत देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये 10,277 लिपिक पदे भरली जाणार आहेत. पूर्व व मुख्य अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतरच उमेदवाराला मुख्य परीक्षेस पात्र ठरवले जाईल. अंतिम यादी मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाणार आहे.
ही भरती बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्णसंधी ठरू शकते. अभ्यासात सातत्य आणि योग्य तयारी केल्यास उमेदवारांना नक्कीच यश मिळू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता IBPS Clerk Bharti 2025 साठी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.
PDF जाहिरात (पूर्ण जाहिरात ) | https://shorturl.at/cBxAF |
PDF जाहिरात | https://shorturl.at/odeNE |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/GGsdn |
अधिकृत वेबसाईट | https://www.ibps.in/ |