नोकरी

Income Tax Department Bharti 2025: आयकर विभागात 386 रिक्त जागा; स्टेनोग्राफर, सचिव, लिपिक अशा विविध पदांची भरती

Income Tax Department Bharti 2025: आयकर विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आली आहे. महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 386 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीत आर्थिक सल्लागार, संयुक्त निबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, सहाय्यक निबंधक, वरिष्ठ खाजगी सचिव, लेखा अधिकारी, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, कायदेशीर सहाय्यक, वरिष्ठ लेखाकार, स्टेनोग्राफर ग्रेड I, सहाय्यक (GSTAT) आणि अप्पर डिव्हिजन लिपिक अशा पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे. वयोमर्यादा जास्तीत जास्त 58 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. सर्व अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे – अवर सचिव, जाहिरात १ क शाखा, महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली-११०००१. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळ www.tnincometax.gov.in वर उपलब्ध असलेल्या सूचना वाचणे गरजेचे आहे. वेतनश्रेणी पदानुसार वेगवेगळी आहे आणि ती 25,500 रुपये पासून 2,15,900 रुपयांपर्यंत आहे.

भरतीतील पदसंख्या आणि वेतनश्रेणी खालील तक्त्यामध्ये दिली आहे:

पदाचे नावपदसंख्यावेतनश्रेणी (महिन्याला)
Financial Advisor1₹1,23,100 – ₹2,15,900
Joint Registrar10₹78,800 – ₹2,09,200
Deputy Registrar9₹67,700 – ₹2,08,700
Principal Private Secretary11₹56,100 – ₹1,77,500
Assistant Registrar2₹56,100 – ₹1,77,500
Senior Private Secretary19₹47,600 – ₹1,51,100
Accounts Officer22₹56,100 – ₹1,77,500
Court Officer29₹47,600 – ₹1,51,100
Private Secretary24₹44,900 – ₹1,42,400
Legal Assistant116₹35,400 – ₹1,12,400
Senior Accountant22₹25,500 – ₹81,100
Stenographer Grade I68₹25,500 – ₹81,100
Assistant (GSTAT)20₹25,500 – ₹81,100
Upper Division Clerk33₹25,500 – ₹81,100

Income Tax Department Bharti 2025

ही भरती प्रक्रिया उच्च पदापासून लिपिकापर्यंतच्या विविध पदांसाठी खुली असून, पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/piTmG
अधिकृत वेबसाईटwww.tnincometax.gov.in

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker