Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

पत्रकारांच्या सन्मानासाठी कोल्हापुरात लक्षवेधी धरणे आंदोलन | Kolhapur Press

Kolhapur Press Club | पत्रकारांच्या कल्याणासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीच्या मागणीसाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने उद्या (सोमवार, १० फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तासांचे शांततापूर्ण धरणे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन दुपारी २ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अधिकाऱ्यांना “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधी”साठी राज्याच्या अर्थसंकल्पात किमान २५० कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या मागणीसाठी आणि निधीच्या पूर्ततेसाठी पत्रकारांनी एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी २८ जानेवारी रोजी विधानभवन, मुंबई येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पत्रकार कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन होत आहे.

कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल भा. धनवडे यांनी सर्व पत्रकारांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा