Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

कोल्हापूर: शाहू छत्रपती समर्थक व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील घोषणांनी उत्तरेश्वर पेठेत तणाव | Kolhapur Loksabha News 2024

कोल्हापूर | खासदार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अशातच शाहू छत्रपती यांचे समर्थक व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उत्तरेश्वर पेठ चौकात एकत्र आल्याने तणाव निर्माण झाला. अचानक घडलेल्या प्रकाराने वाहतूक ठप्प झाली होती, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून दोन्ही गटांना तेथून घालवले.

खासदार मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्याचे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत. शनिवारी सकाळी उत्तरेश्वर पेठ येथे शाहू छत्रपती समर्थक एकत्र आले होते. त्याचवेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यासाठी शिंदेसेनेचे पदाधिकारी जात होते. दरम्यान काँग्रेस समर्थकांनी शाहू छत्रपती यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी याच चौकात थांबले होते. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही संजय मंडलिक यांच्या विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या मार्गावरून जाणारी वाहने थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना तेथून घालवले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा