Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

Shirol Crime News | सोशल मिडीयावरील रिल्समुळे शिरोळमधील ‘त्या’ युवकाचा खून; दोन अल्पवयीन ताब्यात

जयसिंगपूर | शिरोळ येथे सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. निलजी बामणी (ता. मिरज, जि. सांगली) येथील 32 वर्षीय राजू मुरलीधर कोलप याचा दोन अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याचा प्रकार (Shirol Crime News) उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा छडा मंगळवारी शिरोळ पोलिसांनी लावला.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलांपैकी एकाने आपल्या मोबाईलवर रिल्स अपलोड केल्या होत्या. त्या रिल्सबाबत कोलप याने त्याला जाब विचारला, “अशा प्रकारच्या रिल्स का ठेवतोस?” यावरून दोघांमध्ये वाद झाला. यातूनच दोन्ही अल्पवयीन मुलांनी धारदार व तीक्ष्ण हत्याराने कोलप यांच्या शरीरावर अनेक वार करून त्यांचा खून केला. यापैकी एक अल्पवयीन सांगली येथील असल्याचे समजते.

पोलिसांनी तात्काळ तपास करत २४ तासांत या घटनेचा उलगडा केला. दोन्ही संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सोशल मिडिया आणि मोबाईलच्या वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा