बातम्याहॅलो कोल्हापूर
मांडुकली येथे बंधाऱ्यावरून कार थेट कुंभी नदीत कोसळली, पाणी कमी असल्याने पिता-पुत्र बचावले | Mandukali Accident
कोल्हापूर | गगनबावडा तालुक्यातील मांडूकली येथे मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी थेट बंधाऱ्यावरून खाली नदीत कोसळली. गाडीमध्ये वडील आणि त्यांचा मुलगा होते. सुदैवाने दोघेही या दुर्घटनेतून (Mandukali Accident) थोडक्यात बचावले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वडील आपल्या मुलासह मोटारीतून घरी परत येत होते. यावेळी मांडूकली येथील बंधाऱ्यावरून जात असताना ब्रेक मारल्याने पुढील सीटवर बसलेला मुलगा खाली पडला. त्याला सावरताना वडिलांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट नदीत कोसळली.
या घटनेदरम्यान नदीत पाणी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोघांनाही काही किरकोळ दुखापत झाली असून सध्या ते सुरक्षित आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच पिता-पुत्र बचावल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.


