Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

बनावट चेकद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेला 57 कोटींचा गंडा; गुन्हा दाखल | Kolhapur ZP Scam

Kolhapur ZP Scam: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बनावट धनादेश तयार करून जिल्हा परिषदेच्या (जि.प.) खात्यातून तब्बल 57 कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, जि.प.च्या वित्त विभागाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही संपूर्ण रक्कम सुरक्षित राहिली असून, पोलिसांत यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बनावट धनादेशाद्वारे 57 कोटींचे व्यवहार – Kolhapur ZP Scam

जि.प.च्या वित्त विभागाच्या नियमित तपासणीदरम्यान, शुक्रवार (दि. 21) सायंकाळी खाते उतारा पडताळणी करताना जि.प. खाते क्र. 01 व 04 मधून मोठ्या रकमा खर्ची पडल्याचे निदर्शनास आले.

  • ₹19.02 कोटी आणि ₹19.96 कोटी हे दोन व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेतून झाले.
  • ₹18.04 कोटी आयडीएफसी बँकेच्या खात्यावर वर्ग झाले.

ही रक्कम वित्त विभागाच्या मूळ धनादेशांशी तपासणी केल्यानंतर बनावट धनादेशाद्वारे मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.

सतर्कतेमुळे रक्कम परत जि.प.च्या खात्यात

घटनेची माहिती मिळताच मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकार्‍यांशी तातडीने संपर्क साधून संशयास्पद व्यवहारांसाठी बँक खाते गोठवण्यास सांगितले. त्यानंतर वर्ग झालेली संपूर्ण रक्कम परत जि.प.च्या मूळ खात्यात जमा करण्यात आली.

मुंबईतील खासगी बँकांमधून बनावट धनादेश भरले

तपासात बनावट धनादेशांवर खोट्या सह्या केल्याचे स्पष्ट झाले असून, हे धनादेश मुंबईतील खासगी बँकांमधून भरल्याचे समोर आले आहे. तसेच, फोकस इंटरनॅशनल या कंपनीच्या नावावर आयडीएफसी बँकेत 18 कोटींपेक्षा अधिक रक्कम वर्ग झाल्याचे आढळून आले. आयडीएफसी बँकेलाही संबंधित खाते गोठवण्यास सांगितले असता त्यांनीही तातडीने कार्यवाही करत शासकीय रक्कम सुरक्षित असल्याचे कळवले.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जि.प. लेखाधिकारी कृष्णात पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दिली असून, फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

“वेळीच फसवणूकीची बाब लक्षात आल्यामुळे आणि बँक अधिकाऱ्यांच्या तत्परतेने कार्यवाही केल्यामुळे जिल्हा परिषदेची संपूर्ण रक्कम सुरक्षित आहे.”
— अतुल आकुर्डे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा