बातम्याहॅलो कोल्हापूर

वाघबिळ घाटात बिबट्याच्या तीन बछड्यांचे दर्शन | Panhala Leopard

कोल्हापूर | कोल्हापूर-पन्हाळा दरम्यानच्या वाघबिळ घाटात बिबट्याच्या तीन बछड्यांचे (Panhala Leopard) प्रवाशांना दर्शन झाले. सोमवारी (ता. १७) रात्री ११ वाजता घाटातील एका वळणावर हे बछडे रस्त्याच्या मधोमध बिनधास्त बागडताना आढळले.

बांधकाम ठेकेदार सचिन पाटील हे कोल्हापूरहून थेरगावला परतताना त्यांच्या कारच्या दिव्यांमध्ये बछडे स्पष्ट दिसले. त्यांनी रस्ता ओलांडून संरक्षण कठड्याच्या आडोश्याला अंधारात पलायन केल्याचे त्यांनी सांगितले. हे बछडे अंदाजे तीन महिन्यांचे असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

या बछड्यांची आई म्हणजेच मादी बिबट्या परिसरातच असण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या घाटातील रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असूनही बिबट्याचा या भागात वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सचिन पाटील यांनी या घटनेची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी मोहिते यांना दिली. त्यांनी तातडीने कार्यवाहीसाठी पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

Back to top button