महाराष्ट्र तलाठी भरती 2025: लवकरच नवी जाहीरात येण्याची शक्यता, जाणून घ्या रिक्त पदांचा तपशील व सविस्तर माहिती | Maharashtra Talathi Bharti 2025

मुंबई | राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. सध्या तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदाच्या एकूण 2471 जागा रिक्त असून, त्या भरून (Maharashtra Talathi Bharti 2025) काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1700 पदे भरण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असून त्यावर कार्यवाही सुरू आहे.
राज्यात सध्या अनेक तलाठ्यांच्या गळतीमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक गावांचा महसूल कारभार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तलाठी भरतीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. 2018-2019 मध्ये झालेल्या भरतीनंतर, कोरोना महामारी, निवडणुका आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर 2023-2024 मध्ये सरळसेवेने 208 व अनुकंपा तत्त्वावर अंदाजे 28 पदांची भरती करण्यात आली. मात्र त्यानंतर कोणतीही भरती प्रक्रिया राबवली गेलेली नाही.
Maharashtra Talathi Bharti 2025
नवीन आकृतीबंधानुसार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तलाठी पदांची भरती होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण घ्यायचे झाले, तर येथे एकूण 654 पदे मंजूर असून त्यापैकी 619 पदांवर भरती झालेली आहे. उर्वरित 35 पदे रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरातील रिक्त पदांचा आकडा तुलनेने कमी आहे.
एकूणच, तलाठी भरतीची प्रक्रिया येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून, राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थींमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.