MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत विविध पदांच्या 134 जागांची भरती, अर्ज प्रक्रिया सुरू | MPSC Group B Bharti 2025

MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट‑ब अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती सुरू होत आहे. आयोगाने “सहायक संचालक, मागणीपधानुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किया केंद्र (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणाची सालागार” या पदांसाठी एकूण १३४ रिक्त जागा भरावयाचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने केले जातील आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.
MPSC Group B Bharti 2025
या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकता प्रमाणे असावी, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षे असावे. आपले वय मोजण्यासाठी आयोगाने Age Calculator सुविधा देखील उपलब्ध करून ठेवली आहे.
अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी ७१९ रुपये तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ किंवा अपंग उमेदवारांसाठी ४४९ रुपये ठेवण्यात आले आहे. अर्ज २५ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होतील आणि १५ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
पदांच्या तपशीलानुसार, सहायक संचालक पदासाठी २ जागा असून, मागणीपधानुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किया केंद्र (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणाची सालागार या पदांसाठी १३२ जागा उपलब्ध आहेत.
अर्ज करताना सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/ ला भेट देऊन अर्ज करणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्याच्या अटी व शर्ती समजून घेण्यासाठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवारांनी अंतिम तारीख लक्षात घेऊन अर्ज वेळेत करणे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा अर्ज प्रक्रियेतून वगळला जाऊ शकतो.
PDF जाहिरात -1 | https://shorturl.at/Pn5Wh |
PDF जाहिरात-2 | https://shorturl.at/CgENX |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/UHYLD |
अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in |