मृद आणि जलसंधारण विभागात 8667 जागांची पदभरती; जाहिरात लवकरच प्रकाशित होणार | Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2025

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मृद व जलसंधारण विभागातील तब्बल ८ हजार ६६७ पदांच्या भरती (Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2025) प्रक्रियेला गती मिळाली असून ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेणार असल्याने ही प्रक्रिया अधिक वेगाने पार पडणार आहे.
विभागातील विविध पदांची भरती बराच काळ रखडली होती. मात्र, उच्चस्तरीय समितीने नव्या आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानंतर ही भरती मार्गी लागली आहे. याबाबत मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत माहिती दिली.
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2025
सन २०१७ मध्ये शासनाने मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला होता. त्यावेळी १६ हजार ४२३ पदांचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे ही पदे विभागाला मिळाली नाहीत. बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला. यात अनावश्यक पदे वगळून ८६६७ पदांचा समावेश करण्यात आला असून त्याला समितीने मान्यता दिली आहे.
भरती जाहिरात लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची ही मोठी संधी उमेदवारांसमोर उपलब्ध होणार आहे.