हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर येथे रन फॉर वोट ‘लोकशाही मॅरेथॉन’चे आयोजन | Run for Vote

कोल्हापूर | मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रन फॉर वोट (Run for Vote) लोकशाही दौडचे आयोजन दि.७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी सहभाग घेणार आहेत.

या दौडमधे देण्यात येणाऱ्या संदेशमय टी-शर्टचे अनावरण जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत आयोजित केलेल्या दौडचे “चला धावूया.. सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट.. लोकशाहीसाठी” हे ब्रीद वाक्य आहे. या ब्रीदवाक्यासह ‘मी मतदान करणारच’ अशा विविध संदेशांचा समावेश केलेल्या टीशर्टचे आनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, स्वीपचे नोडल अधिकारी निलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट, सिनेकलाकार आनंद काळे, कोल्हापूर स्पोर्ट क्लबचे चेतन चव्हाण, विजय कुलकर्णी, आकाश कोरगावकर, डॉ.प्रदिप पाटील, संजय पाटील, गोरख माळी, आशिष तंबाके, उत्तम फराकटे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बघा आबा, कोल्हापूर दर्शन व कोल्हापूर सर्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व सहभागी एकत्र जमणार

पोलीस मैदान, कसबा बावडा येथे ७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व सहभागी एकत्र जमणार असून ६.३० वा. १० किमी, त्यानंतर ६.४० वाजता ५ किमी, तर ६.५० वा. ३ किमीसाठी धावणारे धावतील. सर्वच सहभागींनी दि.७ एप्रिल रोजी सकाळी ६ वा मैदानावर उपस्थित असणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या दौडमधून संदेश देण्यात येणार आहे.

या दौडमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून आता निःशुल्क नोंदणीसाठी २ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9 या लिंकवरती इच्छुक नि:शुल्क नोंदणी करु शकतील. आत्तापर्यंत जवळपास तीन हजार जणांनी या दौडमध्ये सहभाग नोंदविला आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker