Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ लाखाचं बक्षीस!

पुणे | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या सात तुकड्या तपास करत आहेत. तसेच, आरोपीला पकडून देणाऱ्यास पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांकडून इनाम जाहीर

पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितले की, “आरोपीला पकडून देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. पोलीस दिवसरात्र तपास करत आहेत. आरोपीने मास्क घातल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसला नाही, मात्र तपासातून त्याची ओळख पटली आहे. तो बस स्थानकांवर फिरणारा असल्याने लवकरच हाती लागेल.”

दत्तात्रय गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

तपासादरम्यान, दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याने यापूर्वीही बस स्थानकांवर मुली आणि तरुणींना पोलीस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. तसेच, तो काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय संबंध आणि तपास दत्तात्रय गाडे एका प्रमुख राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कातील राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांना संशय आहे की त्याने स्वारगेटव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

भूतकाळातील गुन्हे दत्तात्रय गाडेवर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर येथे गुन्हे दाखल आहेत. त्याने ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडल्याचे गुन्हेही नोंद आहेत. २०११ मध्ये त्याने कर्ज काढून घेतलेल्या चारचाकी गाडीने पुणे-अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करताना अनेक महिलांना लुबाडले होते. पोलिसांनी त्याचा भाऊ, पत्नी आणि आई यांचे जबाब नोंदवले आहेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker