बातम्या

आधी अत्याचार, आता 30 हजारांची चोरी.. स्वारगेट बसस्थानकात चाललंय काय? बस कंडक्टरचेच पैसे लंपास | Swargate Bus stand, Pune

पुणे | शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर दोन वेळा अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 13 पथके तैनात केली आहेत. या प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाच, याच स्वारगेट बस स्थानकात एका महिला वाहकाचे 30 हजार रुपये चोरीला गेल्याचा प्रकारही उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी फरार, शोधासाठी 13 पथके तैनात

स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर दोन वेळा अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 13 पथके तैनात केली आहेत. आरोपी शिरूरचा रहिवासी असून, याआधीही त्याच्यावर चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांची मदत मागितली असून, त्याची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

महिला कंडक्टरची 30 हजार रुपयांची रोकड चोरीला

स्वारगेट बस स्थानकात आणखी एका प्रकाराने खळबळ उडाली आहे. सातारवरून आलेल्या एका महिला वाहकाचे तिकीट विक्रीतून जमा झालेले 30 हजार रुपये चोरीला गेले. ती महिला वाहक फ्रेश होण्यासाठी वॉशरूमला गेली असताना तिची पैशांची बॅग लांबवण्यात आली. बसमधून उतरताना प्रवासी खाली उतरले होते, मात्र बसमध्ये उरलेल्या 3-4 जणांपैकीच कोणीतरी बॅग चोरल्याचा संशय आहे. यासंदर्भात डेपोमध्ये तक्रार नोंदवण्यात येणार आहे.

या दोन्ही घटनांमुळे स्वारगेट परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास सुरू केला आहे.

Back to top button