बातम्या

Pune Rape Case : दत्ता गाडेला आता फाशीच? पीडितेचा धक्कादायक जबाब, म्हणाली; “दादा काय करायचंय ते कर पण…”

पुणे | पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दत्ता गाडे याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. यापूर्वी आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलाने, संबंधित तरुणीसोबत सहमतीने संबंध ठेवले गेले असल्याचा दावा केला होता. मात्र, आता पीडितेने दिलेल्या जबाबानंतर या दाव्याला छेद मिळाला आहे.

पीडितेच्या जबाबानुसार, बलात्कारानंतर आरोपीने तिला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने आरोपीला विनंती करत, “दादा, काय करायचं आहे ते कर, पण मला जीवे मारू नको,” असे सांगितले होते. पोलिसांनी या जबाबाची नोंद घेतली आहे.

याशिवाय, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत तरुणीच्या प्रवासाचे तिकीट महत्त्वाचा पुरावा म्हणून गोळा केले आहे. तसेच, आरोपी दत्ता गाडे याचा फोन तांत्रिक तपासणीसाठी घेतला असता, पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात पूर्वी कोणताही संपर्क नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दत्ता गाडेच्या वकिलाचा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच, बसमध्ये खिडक्या नसल्यामुळे पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यास आवाज बाहेर जाण्याची शक्यता नव्हती, हेही तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा