बातम्या

Datta Gade समजून पोलिसांनी भलत्याच व्यक्तीला केली अटक, स्वारगेट बलात्कार प्रकरणी नेमकं काय घडलं?

पुणे | स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी गुरुवारी (ता. 27) मध्यरात्री अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम कार्यरत होत्या. अखेर गुणाट गावातील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले.

दत्ता गाडे (Datta Gade) गावात लपल्याची मिळाली माहिती

बलात्काराच्या घटनेनंतर दत्ता गाडे आपल्या मूळ गावी, गुणाट येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांची अनेक पथके गुणाट गावात दाखल झाली होती. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो गावातच असल्याचे समजले. अखेर, मध्यरात्री शोध मोहिमेत पोलिसांनी शेतातून त्याला अटक केली.

चुकीच्या तरुणाला केली अटक

दरम्यान, पोलिसांनी आरोपी गाडेला अटक करण्याआधी गावातील एका तरुणाला चुकीने ताब्यात घेतल्याची घटना समोर आली. हा तरुण हुबेहूब दत्ता गाडेसारखा दिसत असल्याने पोलिसांनी त्याला आरोपी समजले. मात्र, पुढील तपासात तो आरोपी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला सोडून देण्यात आले.

पोलिसांनी ज्याला पकडलं होतं तो हुबेहूब आरोपी दत्ता गाडेसारखा दिसणारा त्याचा भाऊ होता. पोलिसांनी पकडताच घाबरलेल्या त्याने, “मी दत्ता नव्हे त्याचा भाऊ आहे. तो माझ्यासारखा दिसतो. तुम्ही त्याला शोधत आहात का?” असं विचारताच पोलिसांना आपली चूक लक्षात आली आणि त्याची सुटका केली.

या संपूर्ण प्रकरणामुळे गावात आणि शहरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Show More
Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा