बातम्या

खंडणीखोर Walmik Karad ची बाजू घेणारा, देवेंद्र फडणवीसांचा हस्तक म्हणत Laxman Hake ला पँथरने दाखवला भरसभेत इंगा…

परभणी | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावरून परभणीमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दलित कार्यकर्त्यांसोबत ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके सहभागी झाले होते. मात्र, मोर्चादरम्यान पँथर संघटनेने हाके यांना चांगलाच इंगा दाखवला.

आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी मोर्चादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या भाषणात हस्तक्षेप करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. खरात म्हणाले, “तुम्ही चळवळीतील नेते असून खंडणीखोर वाल्मिक कराड यांची बाजू घेता. तुम्ही भाजपचे हस्तक आहात आणि आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत आहात. जर तुम्ही असेच वागत राहिलात, तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही.”

घटनास्थळी तणाव निर्माण

खरात यांच्या आरोपांमुळे आणि भाषण थांबवल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रचंड गोंधळानंतर लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, “मी भाजपचा हस्तक नाही, ना त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही. तसेच, माझे त्यांच्यासोबतचे कोणतेही फोटो नाहीत.”

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker