Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

Sachin Tendulkar | तेंडुलकर कुटुंबीय नृसिंहवाडी येथे दत्तचरणी नतमस्तक

नृसिंहवाडी | प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या कुटुंबाने आज दुपारी नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. तेंडुलकर कुटुंबाची श्री दत्त प्रभूंवर मोठी श्रद्धा असल्याने त्यांनी विशेषतः येथे भेट दिली. यावेळी सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी दत्त चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.

सकाळी साडेदहा वाजता मुंबईहून कोल्हापुरात विमानाने आल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे पोहोचले. तेंडुलकर कुटूंबियाना पाहण्यासाठी यावेळी मंदिर परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

दर्शनावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी तेंडुलकर कुटुंबाला श्री दत्त महाराजांची प्रतिमा भेट दिली. तसेच, नवल खोंबारे यांनी मंदिराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मठातही दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबाने कोल्हापूरकडे प्रयाण केले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा