Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

संजय मंडलिकांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आपल्याच पराभवाची पायाभरणी केली! Kolhapur Loksabha Election 2024

“हसन तू लवकर ये. रात्री बारा वाजायला आलेत पण तू येच.. पोरगा, दारू पिऊन लय दंगा करायला लागलाय.. नवीन कोच फाडले, टेलिफोन बी फोडलाय. येऊन त्याला कुठेतरी घेऊन जा” असं साहेबाला सांगायला लागायचं आणि मग त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हायची..!

मग पुढे 36 चा आकडा राजकारणात सुरू झाला. राजकारण ते राजकारण. कोण कोणाचा मित्र होतो आणि कोण कोणाचा शत्रू होतो कळत नाही. साहेबाना सारे पूरोगामी म्हणायचे. बहुजन समाज नावाचे साप्ताहिक त्यावेळेला पी व बी पवार, दादा जगताप काढायचे आणि साहेबांचा त्याला पाठिंबा असायचा. कराडचे यशवंतराव मोहिते हे अनेकांचे वैचारिक गुरु होते. यशवंतराव चव्हाण तर होतेच होते.

साहेब साहेब होता त्याची तळागाळातल्या लोकांच्या वरची माया आगळीच होती. खऱ्या अर्थाने तो बहुजन समाजाचा नेता होता तेल लावलेल्या पैलवानाबरोबर शड्डू ठोकून खासदारकी मिळवणं सोपं नव्हतं. त्यांनी ते मिळवून दाखवलं, पण ह्या पुरोगामीचा वारसा पोराने ठेवला नाही. त्याला मार्गदर्शन करायला कोणी नसल्यामुळे आपल्याच पायावर दगड मारणारे भाष्य करत सुटला. म्हणाला विद्यमान छत्रपती शाहू या गादीचे वारसच नाहीत”. या बिचाऱ्याला माहित नाही या गादीला फाटकी गादी म्हणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनाही कोल्हापूरच्या मातीने लोळवलं. त्यांना येऊ दिलं नाही, पाय टाकू दिला नाही.
म्हणूनच संजय मंडलिकांनी अकारण आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे आणि स्वतःच्याच अपयशाची पायाभरणी केली आहे.

  • डॉ. सुभाष देसाई (ज्येष्ठ पत्रकार)

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा