Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

हुर्रर्रर्र… सतेज पाटलांनी हातात कासरा पकडून हाकला बैलगाडा | Satej Patil

MLA Satej Patil drives a bullock cart in Nerli village, video goes viral on social media

कोल्हापूर | राज्याच्या राजकारणात ‘बंटी पाटील’ म्हणून परिचित असलेले कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण राजकारण नसून थेट बैलगाडा शर्यतीचा थरार आहे! करवीर तालुक्यातील नेर्ली गावात त्यांनी स्वतः कासरा हातात धरला, खांद्यावर चाबूक घेतला आणि थेट बैलगाडा हाकला. त्यांच्या या धडाडीच्या अंदाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

१ जून रोजी नेर्ली येथे बेंदूर सणानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक उत्साह आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या शर्यतीकडे बैलगाडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी बैलगाडा हाकून स्पर्धेपूर्वीचा थरार स्वतः अनुभवल्याने शर्यतीचा उत्साह आणखी वाढला आहे. यातून पारंपरिक ग्रामीण खेळांप्रती त्यांचा असलेला प्रेमभाव यामध्ये पुन्हा दिसून आला.

“हुर्रर्रर्र…” असा आवाज देत आमदार पाटलांनी बैलगाडीला वेग दिला, आणि हा रोमांचक क्षण पाहणाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. यामाध्यमातून सतेज पाटील यांनी पारंपरिक क्रीडा प्रकाराला चालना आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा बैलगाडी चालवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सतेज पाटील यांच्या या व्हायरल व्हीडीओमुळे राजकारणात देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. कुणी कितीही पळत असलं तरी त्यांच्या राजकारणाचा कासरा आपल्याच हातात असल्याचा अप्रत्यक्ष संदेश सतेज पाटील यांनी यातून दिल्याचे बोलले जात आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा