Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

अखेर गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळेंचा राजीनामा! Arun Dongle

कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या गोकुळ दूध संघाचे (Gokul Milk) अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांनी आपला राजीनामा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सादर केला. पाटील यांनी तातडीने हा राजीनामा संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे सुपूर्त केला. गुरुवारी, म्हणजेच २२ तारखेला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत डोंगळे यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर होण्याची शक्यता आहे.

हॅलो कोल्हापूरने यापूर्वीच अरूण डोंगळेची तलवार म्यान या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करत डोंगळे मंगळवारी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर 16 मे रोजी ‘गोकुळ’मधील अरुण डोंगळेंच बंड होणार थंड! ही देखील बातमी प्रकाशित केली होती.
अरूण डोंगळेची तलवार म्यान, राजीनामा देण्याची तयारी! Arun Dongle

डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करत राजीनामा देण्यास यापूर्वी नकार दिला होता. यामुळे गेले सात दिवस गोकुळ संघाच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. रविवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा पेच मिटवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन राजीनामा द्यावा, अशी सूचना डोंगळे यांना करण्यात आली होती.

या सूचनेनुसार डोंगळे सोमवारीच मुंबईकडे रवाना झाले होते. मंगळवारी त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा सादर केला. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी डोंगळे यांचे बंड मोडून काढण्यात यश मिळवले असून, त्यांनी इतर सहकारी संस्थांतील बंडखोरांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा सहकार क्षेत्रात रंगू लागली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा