Sayaji Shinde : सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल; सर्जरीनंतर डॉक्टर म्हणाले…
सातारा | मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया पार पडली आहे. काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सयाजी शिंदेंची प्रकृती ठिक : डॉक्टरांची माहिती
सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देताना म्हणाले,”सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं”.
मराठी सिनेसृष्टीसोबतच दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील सयाजी शिंदे यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.


