Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

अखेर भाजपच्या बड्या नेत्यानं दिला राजीनामा, आता लढवणार शरद पवार गटाकडून निवडणूक | Sharad Pawar

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.  या भेटीनंतर त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धैर्यशील मोहिते पाटील हे येत्या 14 एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. येत्या 14 एप्रिलला अकलूजमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत, तर 16 एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील गटाने मागणी केली होती. मात्र भाजपने याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भाजपच्या वतीने मोहिते पाटील यांच्या मनधरणीचे अनेकदा प्रयत्न झाले होते, मात्र त्यात भाजपला यश आलं नाही. त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे.

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून रणजीत सिंह निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य दिले होते, त्यामुळे माढा मतदार संघात मोहिते पाटील यांच्या मनातीलच खासदार हा दिल्लीत जातो असा इतिहास आहे. मात्र यंदा मोहिते पाटलांची नाराजी पत्करून भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी दिली.

2019 लोकसभेला माळशिरस विधानसभा मतदार संघातून खासदार निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली, यामुळे निंबाळकर विजयी झाले. यानंतर मतदार संघात विकास कामाचं श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून मोहिते पाटील गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली होती.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा