Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

खासदार संजय मंडलिक बरळले, केलं शाहू महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य | Kolhapur Loksabha Election 2024

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापल्याचे पहायला मिळत आहे. काही लोकांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते आता कोणत्याही पातळीवर जाऊन टिका करत असल्याची चर्चा आता कोल्हापूरात सुरू झाली आहे. त्यातच महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी त्याच्या विरोधातील उमेदवार शाहू महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने यात आणखीनच भर पडली आहे.

खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या भाषणात “आताचे महाराज दत्तक आलेले आहेत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे” असे उद्गार काढलेत. कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यावरील या टीकेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यामुळे प्रा. संजय मंडलिक यांच्यावर सर्वच स्तरातून टिका सूरू झाली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. नेसरी येथे शिवशाहीतील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक, त्यांचा अश्वारूढ पुतळा आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी बोलतानाच संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा नमोल्लेख न करता त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले.

मल्लाला हातच लावायचा नाही मग कुस्ती कशी होणार? Kolhapur Loksabha Election 2024

चंदगड तालुक्यातील नेसरी येथे बुधवारी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना संजय मंडलिक म्हणाले, “मल्लाला हातच लावायचा नाही… मल्लाला टांगच मारायचे नाही… मग ती कुस्ती कशी होणार? कुस्ती तर झाली पाहिजे…”

आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत

“आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. कारण ही शाहू महाराजांची भूमी आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पुरोगामी व समतेचा विचार जपला शिकवला. या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक महिला, पुरुषमध्ये जन्मजात डीएनएमध्ये हवेत आणि पाण्यात शाहूंचे गुण आहेत, असेही यावेळी मंडलिक म्हणाले आहेत. संजय मंडलिक यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आता काँग्रेस नेत्यांमधून व शाहूप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी प्रचार सभेत केल्यानंतर कोल्हापूरसह राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. कोल्हापुरात शाहूप्रेमी जनतेकडून तसेच सोशल मीडियात मंडलिक यांच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी होत असताना त्यांनी एक शब्द चुकलो असे सांगतानाच मी अपमान केला नाही, असा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांनी पुन्हा एकदा शाहू महाराजांना उद्देशून प्रश्न विचारले आहेत. 

बोलताना एक शब्द चुकला

शाहू महाराज यांच्याबद्दल वाद पेटल्यानंतर संजय मंडलिक वाद म्हणाले की, मी बोलताना एक शब्द चुकला. आताचे शाहू महाराज हे थेट वारसदार नाहीत, असं मला म्हणायचं होतं. शाहू महाराज यांच दत्तक विधान झालं आहे की नाही हे त्यांनी सांगावं, दत्तक विधान कसं झालं हे देखील सांगावं? त्यामुळे मी शाहू महाराजांचा कोणताही अपमान केला नाही, असा दावा संजय मंडलिक यांनी केला. 

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker