Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

जयसिंगपूर: पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई, कोल्हापूर पोलिस दलात खळबळ | Jaysingpur Police

कोल्हापूर | कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस (Jaysingpur police) ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी विशाल खाडे, अमोल अवघडे व विजय पाटील असे निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ही कारवाई केली आहे. अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याच्या तक्रारीवरून निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्यांना कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलिस निरीक्षक याचेठिकाणी हजेरी देण्याची, तसेच पोलिस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाईमुळे कोल्हापूर पोलिस दलात खळबळ

निलंबित कार्यकाळात तीन पोलिस कर्मचार्‍यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलिस निरीक्षक यांचे ठिकाणी हजेरी देण्यात यावी, तसेच पोलिस उपअधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्याचे नाही, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील राजकीय नेत्यांबरोबरच व्यापारी, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ महिन्यापूर्वी केली होती. यातूनच ही कारवाई झाल्याचे समजते. गुरुवारी ही कारवाई झाल्याचे समजल्यानंतर शिरोळ तालुक्यातील पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा