
Tractor Anudan Yojana: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी एक दिलासादायक योजना राबवली जात आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या या योजनेमुळे शेतीशी निगडित गटांना मिनी ट्रॅक्टर आणि आवश्यक उपसाधनांची खरेदी करण्यासाठी तब्बल 90 टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे.
ही योजना शेतकरी बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आखण्यात आली आहे. योजनेअंतर्गत 9 ते 18 एचपी क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलरसारखी शेतीची साधने खरेदी करता येणार आहेत. एकूण खरेदी खर्च 3.50 लाख रुपये गृहित धरून यामध्ये 3.15 लाख रुपयांपर्यंत शासन अनुदान देणार आहे, तर उर्वरित 35 हजारांचा खर्च गटाने करावा लागेल.
Tractor Anudan Yojana – अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी :
- अर्जदार बचत गट महाराष्ट्रात नोंदणीकृत असावा.
- गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.
- अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्यांची जात प्रमाणपत्रे, गट नोंदणी, बँक खात्याचा तपशील आणि खरेदीसाठी आवश्यक साहित्याचा अंदाजपत्रक अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.
- गटाचा शेतीशी प्रत्यक्ष संबंध असावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
30 जून 2025 ही शेवटची तारीख असून, इच्छुक बचत गटांनी वेळेत अर्ज सादर करून लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी:
महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यातील समाजकल्याण विभाग किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटीद्वारे किंवा अधिकृत नंबरवरून माहिती मिळवता येईल.
ही योजना ग्रामीण भागातील लहान शेतकरी आणि बचत गटांसाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे, ज्यामुळे शेती यांत्रिकीकरणाला चालना मिळून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.