Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
नोकरी

उल्हासनगर महानगरपालिका येथे 149 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड | Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीत “मायक्रोवायलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर (औषध), प्रसूती स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ” या पदांसाठी एकूण ८० रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी दिलेल्या तारखेला, म्हणजे ८ सप्टेंबर २०२५ पासून १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत, संबंधित पत्त्यावर मुलाखतीस येणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून उमेदवारांना मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असून, अधिक तपशील मूळ जाहिरातीत उपलब्ध आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ http://www.umc.gov.in वरुन जाहिरात तपासून घेणे गरजेचे आहे. निवड प्रक्रिया फक्त मुलाखतीवर आधारित आहे आणि अर्जासाठी वेळोवेळी अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

ही भरती वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे, जे वैद्यकीय अधिकारी, तज्ञ डॉक्टर किंवा संबंधित तपासणी आणि उपचार क्षेत्रातील आहेत, त्यांच्यासाठी ही संकेत दिलेली आहे. अधिकृत माहिती आणि जाहिरात तपासून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/Qh1oV
अधिकृत वेबसाईटhttp://www.umc.gov.in

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत “एपिडेमियोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, स्टाफ नर्स, हेल्थ वर्कर, औषध निर्माता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कार्यकर्ता” पदांच्या 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०४ सप्टेंबर २०२५ आहे.

  • पदाचे नाव – एपिडेमियोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, स्टाफ नर्स, हेल्थ वर्कर, फार्मास्युटिकल प्रोड्युसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कार्यकर्ता
  • पदसंख्या –69 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – उल्हासनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ सप्टेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
एपिडेमियोलॉजिस्ट 01
पब्लिक हेल्थ मॅनेजर 02
स्टाफ नर्स 23
हेल्थ वर्कर 07
औषध निर्माता03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
बहुउद्देशीय कामगार32

How to Apply For Ulhasnagar Mahanagarpalika Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२५ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.    
PDF जाहिरातhttps://shorturl.at/Qh1oV
अधिकृत वेबसाईटhttp://www.umc.gov.in

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker