नोकरी

Upcoming Government Jobs 2026 | सरकारी नोकऱ्यांच्या तयारीत असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Upcoming Government Jobs 2026: नव्या वर्षाचं स्वागत झालं असून अनेक जण पुन्हा एकदा आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करत आहेत. विशेषतः सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रत्येक नवीन वर्ष म्हणजे संयम, मेहनत आणि सातत्याची कसोटी असते. “गेल्या वर्षी जमलं नाही, पण यावर्षी सरकारी नोकरी मिळवायचीच” असा निर्धार करून हजारो उमेदवार अभ्यासाला लागले आहेत. तुमचंही हेच उद्दिष्ट असेल, तर येत्या काळात जाहीर होणाऱ्या सरकारी भरतींबाबत अपडेट राहणं आणि तयारी अधिक मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे.

दरवर्षी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवल्या जातात. या भरतींमुळे दहावी पासपासून ते पदवीधर, अभियंते आणि उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी संधी उपलब्ध होतात. 2025-26 या कालावधीतही अनेक महत्त्वाच्या भरती जाहीर होण्याची शक्यता आहे.

SSC भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दरवर्षी CGL, CHSL, GD कॉन्स्टेबल, MTS, CPO, JE अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. या भरती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीची संधी देतात. यंदाही SSC कडून वेळापत्रकानुसार या परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता असून दहावी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.

इंडिया पोस्ट GDS भरती 2026
टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीकडे तरुणांचा विशेष ओढा असतो. कारण या भरतीसाठी लेखी परीक्षा नसून दहावीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाते. GDS 2026 च्या रिक्त पदांची घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती.

रेल्वे भरती
रेल्वे भरती बोर्डाने (RRB) जाहीर केलेल्या वार्षिक कॅलेंडरनुसार 2026 मध्ये विविध टप्प्यांमध्ये भरती होणार आहेत. जानेवारी ते मार्चदरम्यान असिस्टंट लोको पायलट, एप्रिल ते जूनमध्ये टेक्निशियन, सेक्शन कंट्रोलर, ज्युनियर इंजिनिअर, जुलै ते सप्टेंबरमध्ये पॅरामेडिकल कॅटेगरी, तर ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये NTPC, मिनिस्ट्रियल, आयसोलेटेड कॅटेगरी आणि लेव्हल-1 भरती जाहीर होऊ शकते.

बँक भरती
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आयबीपीएस आणि एसबीआय मार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरती होते. आयबीपीएस क्लार्क, पीओ, आरआरबी क्लार्क/पीओ, एसबीआय क्लार्क, एसबीआय पीओ आणि स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) अशा पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. 2025 मध्येही या भरती अपेक्षित असून तयारीला लागलेल्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 2026
IAS, IPS आणि इतर केंद्रीय सेवांसाठी UPSC दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतो. 2025 मध्ये जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यावर्षीही जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान अधिसूचना येण्याची शक्यता असून लाखो उमेदवार ही परीक्षा देतात.

सैन्य भरती 2026
देशसेवेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी UPSC मार्फत NDA आणि CDS परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात. याशिवाय अग्निवीर योजना तसेच भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलातील विविध भरती प्रक्रियाही सुरू राहणार आहेत.

अन्य प्रमुख भरती
राज्यस्तरीय आयोगांमार्फत UPPSC, BPSC, MPPSC यांसारख्या PCS परीक्षा घेतल्या जातात. बिहार शिक्षक भरतीचा चौथा टप्पा (TRE 4.0) जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश पोलिस दलात 32 हजारांहून अधिक पदांसाठी कॉन्स्टेबल आणि तुरुंग वॉर्डर भरतीची जाहिरात 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून संपूर्ण जानेवारी महिन्यात अर्ज करता येणार आहेत.

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी येणारं वर्ष संधींनी भरलेलं असू शकतं. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवले, तर यश निश्चितच मिळू शकतं.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker