बातम्या

देशातील 1 कोटी तरुणांना टॉपच्या 500 कंपन्यात इंटर्नशिपची संधी, महिन्याला 5000 रुपये आणि बरंच काही… | Union Budget 2024

Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी बजेट मांडताना सांगितले की, सरकारचा देशात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी कल आहे. सरकारने रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने पाच नव्या स्कीम आणल्या आहेत. रोजगारासाठी सरकारने 2 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशीप (Internship Scheme) दिली जाईल. ही इंटर्नशीप 12 महिन्यांसाठी असणार आहे. 

20 लाख युवकांना मिळणार ट्रेनिंग – Union Budget 2024

निर्मला सीतारमण म्हणाल्या, तरूणांना रोजगार मिळावा यासाठी 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. एवढंच नाही तर रोजगाराबरोबरच सरकार इन्सेंटिव्ह देणार आहे. त्यासाठी इन्सेंटिव्हच्या तीन योजना आणणार आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत तीन टप्प्यात हा इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे. इंडस्ट्रीसोबत कामगारांसाठी वर्किंग हॉस्टेल बनवण्यात येणार आहे. 

मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे की, मोदी सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत 500 मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपला प्रोत्साहन दिले जाईल. सरकारच्या इंटर्नशिप योजनेचा 1 कोटी तरुणांना फायदा होणार आहे. याअंतर्गत तरुणांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये इंटर्नशिप स्टायपेंड दिला जाणार आहे.

इंटर्नशिप पूर्ण होताच 6 हजार रुपये मिळणार

इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना 6,000 रुपयांची वेगळी रक्कमही दिली जाणार आहे. या सरकारी योजनेंतर्गत 5 वर्षात 1 कोटी तरुणांना फायदा दिला जाणार आहे.

स्कीम सी रोजगार आणि कौशल्य विकास

नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते, याआधारे संबंधित नोकरदाराला दोन वर्षे महिन्याला 3000 रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जाईल. यामुळे 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

या नोकरदारांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नव नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता अर्थात Incentive दिला जाईल. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील. या योजनेमुळे 2 कोटी 10 लाख तरुणांना फायदा होईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम बी  योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेल्या स्कीम बी योजत उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढवणे हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधीत जमा करणाऱ्या रक्कमेच्या हिशेबाने इन्सेन्टिव्ह देण्यात येईल. पहिले चार वर्ष संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker